
सिन्नर ( प्रतिनिधी ) १ नोव्हेंबरे २०२५ दिवंगत डाॅ.नरेंद्र दाभोलकर व दिवंगत मार्क्स यांच्या संयुक्त जयंती महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे साजरी करण्यात आली*या कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत डाॅ.नरेंद्र दाभोलकर व दिवंगत कार्ल मार्क्स यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले*या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की* डाॅ.नरेंद्र दाभोलकर हे बुद्धिवाद विज्ञानवादी, समाजिक कार्यकर्त होते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा,अनिष्ट रुढी,परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते. इ.स. १९८९ साली नरेंद्र दाभोळकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाची वेगळी संघटना सुरू केली. ते स्वत या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. नरेंद्र दाभोलकर यांची मंगळवार दि. २० ऑगस्ट, २०१३ रोजी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या ओंकारेश्वर पूलावर अज्ञातांनी ४ गोळ्या झाडून हत्या केली.

अशा क्रांतिकारी विचारवंत दिवंगत डाॅ.नरेंद्र दाभोलकर यांना विनम्र अभिवादन *तसेच कार्ल मार्क्स* हे १९ व्या शतकातील एक जर्मन अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केले पण त्यांचे वर्गसंघर्षावरील लिखाण हे जास्त प्रसिद्ध आहे. फ्रेडरिक एन्जेल्स प्रमाणे मार्क्सने देखील तत्कालिन राजकीय लढ्यांमध्ये भाग घेतला. कार्ल मार्क्स यांनी “दास कॅपिटाल” या ग्रंथाचा पहिला खंड इ.स.१८६७ मध्ये प्रसिद्ध केले.कार्ल मार्क्स यांच्या विचारांची लोकप्रियता सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर कमी झाली असली तरी ते विचार शिक्षण क्षेत्र, राजकीय क्षेत्र, कामगार लढा यामध्ये अजूनही लोकप्रिय आहेत. मार्क्स यांचे विचार अनेक कम्युनिस्ट राज्ये आणि राजकीय चळवळींमध्ये अजूनही आदर्श मानले जातात.ते वर्ग संघर्षाचे प्रणेते होते प्रमुख योगदान आणि विचार वर्ग कार्ल मार्क्स यांच्या मते, सर्व इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. त्यांनी भांडवलदार वर्ग आणि कामगार वर्ग यांच्यातील सततच्या संघर्षावर जोर दिला.व जगातील सर्व कामगार वर्ग संघटीत होण्यासाठी आव्हान करणारे कार्ल मार्क्स यांना विनम्र अभिवादन *या कार्यक्रमचे सुत्रसंचलन प्राध्यापक रविंद्र कांबळे सर यांनी केले व प्रास्थाविक विजय मुठे यांनी केले.तर आभार रुपेश मुठे यांनी मानले*याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे, मा.नगरसेवक रूपेशभाऊ मुठे प्राध्यापक रविंद्र कांबळे सर,सुरज गोसावी,शाम डांगे, सोपन डगळे,रमेश सालमुठे संदीप मुठे आदि उपस्थित होते
