
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०७६ वा दिवस
गुढवादाच्या मागे लागणे आणि अंधश्रद्धांचे बळी होणे ही दौर्बल्याची आवनतीची आणि साक्षात मृत्यूची चिन्हे आहेत. त्यांच्यापासून सदैव सावध असा. कणखर व्हा! कसल्याच कुबड्या न घेता स्वतःच्या पायावर उभे राहा. आपल्या आकलनापलिकडच्या निसर्गघटनांना आपण चमत्कार म्हणतो, पण खरं म्हणजे गुढ असे त्यात काहीच नसते. धर्मातील सत्ये हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांवर तपस्या करणार्या काही गुप्त मंडळींची मिरासदारी नाही. अशी रहस्यमय गुप्त मंडळी कुठेही अस्तित्वात नाहीत. उगाच अंधश्रद्धेच्या मागे लागू नका त्यामुळे अवनती आणि मृत्यू यांची वाट चालण्यापेक्षा तुम्ही सरळ नास्तिक झालात तरी सुद्धा तुमचे आणि या समाजाचे भले होईल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १० कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक शुक्ल /शुध्द १०
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. १ नोव्हेंबर २०२५
★ १८७३ बंगाली नाटककार दीनबंधू मित्र यांचा स्मृतीदिन
★ १९२१ आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार शरद गणेश तळवलकर यांचा जन्मदिन
★ १९४५ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्मदिन.
★ १९५६ भाषावार प्रांत रचना दिन.
★ १९५६ भारताचे दक्षिण टोक कन्याकुमारी केरळ राज्यातून तामिळनाडू राज्याला हस्तांतरित करण्यात आले.
★ १९९४ शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांचा स्मृतिदिन
★ जागतिक शाकाहारी दिन.
