
सरदार पटेलांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, डाॅ. धनराज धनगर, कार्यालयीन अधिक्षक भालचंद्र पेंढारकर, डाॅ. स्वाती सोनवणे, प्रा. सुरेखा राजवळ, प्रा. धनंजय पेहेरकर, प्रल्हाद जाधव, सोमनाथ कुवर, मनोज परदेशी आदि.
येवला,( प्रतिनिधी )ता. ३१ ऑक्टोबर, २०२५ येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती, राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित सरदार पटेलांच्या प्रतिमापूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी लोहपुरूष सरदार पटेलांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. स्वतंत्र भारतात संस्थानांचे विलिनीकरण व राष्ट्रीय एकात्मता यात सरदार पटेलांचे योगदान मोठे असल्याचे ते म्हणाले. यावेळी परीक्षा विभागप्रमुख डाॅ. धनराज धनगर, कार्यालयीन अधिक्षक भालचंद्र पेंढारकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. सुरेखा राजवळ, प्रा. धनंजय पेहेरकर, डाॅ. स्वाती सोनवणे, श्री प्रल्हाद जाधव, सोमनाथ कुवर, मनोज परदेशी आदि उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांच्या हस्ते लोहपुरूष सरदार पटेलांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली. महात्मा गांधीच्या प्रभावाखाली त्यांनी स्वातंत्र्यासाठी काम केले. गुजरातच्या खेडा,आणंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.सरदार वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले.

फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य महत्त्वाचे होते. हिंदुस्थानातील ५६५ संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. अशी माहितीही प्राचार्य गमे यांनी यावेळी दिली.

