
३१ ऑक्टोबर २०२५ दिवंगत लोहपुरुष सरदार वल्लाभाई पटेल यांच्या १५० वी जयंती महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे त्यांना अभिवादन करण्यात आले
या कार्यक्रमाची सुरुवात ,दिवंगत सरदार वल्लाभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ता वायचळे म्हणाले की
सरदार वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले.

फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे अशा महान लोहपुरुष सरदार वल्लाभाई यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे सुञसंचलन राकेश सोनवणे यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार रोहित मुठे यांनी मानले
याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे राकेश सोनवणे,
रोहित मुठे,लखन पाचोरे, किरण मुठे संदिप दराडे पियुष वाघ कतिॅक मुठे आदि उपस्थित होते
