
नांदगाव( प्रतिनिधी)–मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात देशाची एकता व अखंडतेचे प्रतीक, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन पर्यवेक्षक अविनाश शेवाळे, वरिष्ठ लिपिक सचिन थेटे व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
‘राष्ट्रीय एकता दिन’ हा सरदार वल्लभाई पटेल यांचा जयंती दिनानिमित्त भारत सरकारने २०१४ मध्ये करण्याची घोषणा केली. सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५६० हून अधिक संस्थांनांचे भारतीय संघराज्यात यशस्वीपणे विलीनीकरण करून भारताला एकसंघ राष्ट्र बनवण्यात अत्यंत महत्त्वाचे भूमिका बजावली.
त्यांच्या या महान योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे तसेच नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता ,अखंडता आणि सुरक्षितता याबद्दल जागरूकता चा निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे.
याप्रसंगी संजय पवार, सुभाष शेळके,अनिल जाधव, वीरेंद्र पवार उपस्थित होते.
