
सिन्नर (प्रतिनिधी)३१ ऑक्टोबर २०२५ दिवंगत इंदिराजी गांधी यांच्या ४१ व्या स्मृतिदिन महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे त्यांना अभिवादन करण्यात आले
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवराय च्या पुतळ्यास तसेच,दिवंगत इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की. भारतातील पहिलीच महिला पंतप्रधान होत्या त्यांनी भारतीय जनतेचे हितासाठी केलेले महत्त्वाचे निर्णय बँकांचे राष्ट्रीयीकरण १९६९ मध्ये १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, जेणेकरून समाजातील गरीब आणि गरजू लोकांना बँकिंग सेवांचा लाभ घेता येईल.गरिबी हटाओ ही त्यांनी घोषणा दिली. याअंतर्गत अनेक सामाजिक आणि आर्थिक योजना सुरू करण्यात आले गरिबी जीवनमान सुधारण्यासाठी १९७५ मध्ये २० कलमी कार्यक्रमाची सुरुवात केली
विजय मुठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की भारताची पहिली यशस्वी अणुचाचणी१९४७ मध्ये पोखरण येथे केली. यामुळे भारताची सुरक्षा मजबूत झाली पंडित नेहरूंनी सुरू केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे घेऊन जात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना करण्यास मदत केली.राहिल त्याचे घर कसल त्याची जमीन अशी घोषणा त्यांनी दिली होती वृद्धापकाळ पेन्शन इंदिराजी गांधी यांनी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना सुरू केली, जी ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या दारिद्र्यरेषेखालील लोकांना पेन्शन दिली अशा महान पंतप्रधान दिवंगत इंदिराजी गांधी यांना विनम्र अभिवादन
कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रकाश माळी यांनी केले तर प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.व आभार मनोज माळी यांनी मानले
या प्रसंगी महामित्र दत्ता वायचळे,आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे, शरद शिरसाठ, नितीन शिरसाठ प्रकाश माळी,मनोज माळी,उध्दव माळी,गणपत काळे,सुभाष परदेशी,अशोक भागवत, सोमनाथ लोहारकर, विलास बकरे,आदि उपस्थित होते
