
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०७५ वा दिवस
एखाद्या मुद्द्यावर कोणी विरोध करत असेल तर ती व्यक्ती तुमच्या विरोधात आहे असा निष्कर्ष काढण्याची घाई करू नका. येथे ध्यानात असू द्या की शुचिता, धैर्य, आणि दृढतेने तेच यश शक्य आहे. आपल्याला लोकांना संघटित करण्याच्या कामात स्वतःला गुंतवून घ्यायचे आहे. आपल्याला माहीत आहे की संपूर्ण सृष्टी ही आपापसात जोडलेली आहे. एखादी व्यक्ती उच्च ध्येयाचा स्पष्ट दृष्टिकोन ठेवून काम करत असेल तर हळूहळू परिस्थिती आणि आजूबाजूचे लोकही उच्च विचार व उच्च मिशनचा भाग बनण्यासाठी परावर्तित होतात.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ९ कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक शुक्ल /शुध्द ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर २०२५
★ १८७५ स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन.
★ १९२० नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर यांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली.
★ १९८४ भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, ‘आर्यन लेडी’ श्रीमती इंदिरा गांधी यांची त्यांच्याच शीख अंगरक्षकाकडून दिल्ली येथे गोळ्या झाडून हत्या, स्मृतिदिन.
★ १९८४ भारताचे सहावे व सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.
★ संकल्प दिन.
★ जागतिक एकात्मता दिन.
