
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी नवनाथ गायकर यांजकडुन*——- खंबाळे, ता.ईगतपुरी गटातील कावनई गणातुन राष्ट्रवादी कॉग्रेंस पक्षाकडुन कर्होळे येथील माजी सरपंच तथा राष्ट्रवादीचे युवा नेते पांडुरंग खातळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असुन, त्यांनी कावनई गणात प्रचारालाही प्रारंभ केला आहे. फक्त गणाचा विकास हाच आपला ध्यास असल्याचे खातळे यांनी म्हटले आहे. ईगतपुरी तालुक्यातील विकासापासुन वंचित असलेल्या गावात विकासाची गंगा आणुन गाव प्रकाशात आणण्याची किमया खातळे यांनी करुन दाखवली आहे. आमदार हिरामण खोसकर, माजी जि.प.सदस्य गोरख बोडके, अँड.संदिप गुळवे आदिचें निकटवर्तीय व विश्वासु मानले जाणारे खातळे हे या गणातुन प्रबळ दावेदार मानले जात आहे. राजकिय, सामाजिक क्षेत्रात उठबस, मोठा गोतावळा व गावा- गावात दांडगा जन संपर्क ही पांडुरंग खातळे यांची जमेची बाजु आहे. विविध प्रकल्पानीं बाधित असलेल्या या भागाचा पंचायत समितीचे माध्यमातुन विकास करु असा दावा खातळे यांनी केला आहे.
