
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन-
महाराष्ट्राची राजधानी मुंबई सह निम्म्या महाराष्ट्राला पिण्याचे व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणारा ईगतपुरी तालुका आजमितीला विविध प्रकल्पानीं बाधीत व विस्थापीत झालेला आहे.हे वास्तव असतानांच पुन्हा नव्याने विविध प्रकल्प या तालुक्यात येत असुन हा तालुका नकाशावरुनच पुसायचा चंग जणु शासनाने बांधला आहे का ? असा संतप्त म्हसुर्ली चे सरपंच तथा राष्ट्रवादीचे युवा नेते जगन्नाथ पोटकुले यांनी केला आहे.
ईगतपुरी तालुक्यात लहानमोठी तेरा धरणे आहेत. याशिवाय मुंबई, शिर्डी, समृद्धी असे मोठ मोठे राष्ट्रीय महामार्ग आहेत.रेल्वे,दोन औद्योगीक वसाहती, लष्कर व वन विभाग अशासाठीही लाखो हेक्टर जमिनी संपादीत झालेल्या आहेत. यामुळे निसर्गरम्य व पावसाचे माहेरघर असणार्या या तालुक्याची अलीकडे विस्थापिताचां तालुका अशी ओळख झाली असुन, जमिनी न राहिल्याने अनेकांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे.
हे सगळे कमी की काय म्हणुन पुन्हा आगामी सिंहस्थ कुंभमेळयाचे पाश्वर्भुमी वर घोटी ते आहुर्ली मार्गे त्रंबकेश्वर चौपदरीकरण राष्ट्रीय महामार्ग , वाढवण बंदरास जोडणारा महामार्ग, पर्यायी नाशिक मार्ग, प्रस्तावित लोहमार्ग व औदयौगीक वसाहती आदी प्रकल्प सुरु होत आहेत.या मध्ये पुन्हा एकदा हजारो हेक्टर सुपिक जमिनी केल्या जाणार असुन शेकडो शेतकरी देशोॉधडीला लागणार आहेत.
विकासासाठी या तालुक्याचे मोठे योगदान आहे.पण सातत्याने विकासासाठी याच तालुक्याचा बळी का ? इथला शेतकरी, व्यावसायिक देशोधडीला लागत असुन त्याला जगण्याचा हक्क नाही का ? हा तालुका नकाशावरुनच पुसायचा आहे का ? असा संतप्त सवाल सरपंच पोटकुले यांनी केला आहे.
तीव्र लढा उभारु
प्रस्तावित नव्या रस्त्यामुळे तालुक्यातील आवळी व आहुर्ली सारखी गावे कायमचीच नकाशावरुन पुसली जाईल अशी भिती व्यक्त करत आता पुढे जगायचे कसे ? असा आर्त सवाल आवळीचे माजी सरपंच पंढरीनाथ पा. जमधडे यांनी केला आहे तर अन्याय थांबवा, अन्यथा तीव्र लढा उभारु असा इशारा कर्होळे येथील माजी सरपंच पांडुरंग खातळे यांनी दिला आहे.
कर्होळे येथील माजी सरपंच पांडुरंग खातळे

