
.ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन कारखाना शाखेचे माजी सचिव सिध्दार्थ जोगदंड व अतिरिक्त सचिव सागर गरूड यांच्या नेतृत्वाखाली असोसिएशन च्या शिष्टमंडळाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघ चे खासदार आयु भास्कर भगरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
(१) केंद्र सरकारने ईपीआयसी निविदा पद्धती सुरू केली आहे ती त्वरित बंद करण्यात यावी.या पद्धतीनुसार रेल्वे आपल्या कामाचे टेंडर एक कंपनीला देईल ती कंपनी आठरवेल की कोणाला काम द्यायचे.या आधी रेल्वे आपल्या रेल्वे मधील कारखाना प्रथम प्राधान्य देत होते.त्यानंतर खाजगी कंपन्याचा विचार करीत होते
.(२) मनमाड वर्कशॉपमध्ये पुरेशी वर्कऑडर मिळावी.
(३ ) वर्कशॉप मधील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी
मनमाड वर्कशॉप मध्ये एकूण जागांपैकी ९०%पदेही ग्रुप डी चे पद रिक्त आहे.
(४) मनमाड वर्कशॉपचे आधुनिकीकरण करण्यात यावे.
आदि मागण्यांचा समावेश आहे.
शिष्टमंडळात ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाडचे सचिव किरण वाघ, कारखाना शाखेचे संघटक सचिव हर्षद सुर्यवंशी, सचिन इंगळे,बहुजन युवक संघचे अध्यक्ष रोहित भोसले,मध्य रेल्वे कनझुमर्स कॉ ऑपरेटिव सोसायटीचे उपाध्यक्ष कल्याण धिवर, कारखाना शाखेचे कार्यकारणी सदस्य विनोद खरे ,आदिचा समावेश होता.
