
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०७४ वा दिवस
पूजा करायची ती सत्याची, कुण्या व्यक्तीची नव्हे हे त्रिकालाबाधित सत्य कायमचे आपल्या हृदयावर कोरुन ठेवा. माझ्या योजनेसाठी माझ्यावर आत्यंतिक प्रेम करणारी अनेक माणसे मला हवी आहेत हे जितके खरे आहे तितकेच मी व्यक्तिनिरपेक्ष असणे आवश्यक आहे. नेता नेहमी व्यक्तिनिरपेक्ष असला पाहिजे. प्रेमाच्या जोरावर जडाचे चैतन्यात रूपांतर करता आले पाहिजे मोठमोठी कार्ये यातूनच उभी राहणार आहेत. राष्ट्र निर्माणाच्या कार्यात आपल्याला असा मनुष्य पाहिजे की ज्याच्या स्वभावाचे सर्व पैलू सारखेच विकसित झाले आहेत. ह्रृदयाने विशाल, बुध्दीने विद्वान, कृतीने श्रेष्ठ असावा. असा मनुष्य हवा की ज्याचे ह्रृदय जगाच्या दु:खांनी व क्लेशांनी कळवळते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ८ कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक शुक्ल /शुध्द ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. ३० ऑक्टोबर २०२५
★ अक्षय नवमी
★ १८८३ तत्त्वज्ञ आणि विद्वान, आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांचा स्मृतीदिन
★ १९०९ भारतीय अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेते डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्मदिन.
★ १९९० मराठी, हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथाकार, अभिनेते, चित्रपती शांताराम राजाराम वनकुद्रे ऊर्फ व्ही शांताराम यांचा स्मृतिदिन.
★ १९९६ लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये यांचा स्मृतीदिन
★ आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन.
