
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८५५ वा दिवस दौर्बल्याच्या मोहनिद्रेतून जागे व्हा. वस्तुतः कोणीही दुर्बल नाही. आत्मा हा सर्वशक्तिमान अनंत व सर्वज्ञ आहे. उठा आपले खरे स्वरूप प्रकट करा. तुमच्या आत वसत असलेल्या ईश्वराची घोषणा करा. त्याला अमान्य करू नका. आत्यंतिक निष्क्रियता, दुर्बलता व मोह ही आपल्या समाजात सर्वत्र पसरलेली दिसत आहे. हे आधुनिक बंधूंनो या मोहजालातून बाहेर पडा. सर्वांच्याच ठायी थोर व सत्प्रवृत्त होण्याची अनंत शक्ती वसत आहे. प्रत्येक जीवाला आपण घोषित करून सांगू या, ‘उत्तिष्ठत् जाग्रत् प्राप्य वरान्निबोधत्’ स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
*★ भारतीय सौर ३ चैत्र शके १९४७*
★ फाल्गुन वद्य /कृष्ण १०
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ सोमवार दि. २४ मार्च २०२५ ★ १६७७ दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.
★ १८५५ आग्रा आणि कलकत्ता यांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
★ १९२९ लाहोर राष्ट्रीय काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु झाले.
★ जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन.


