
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०७३ वा दिवस
काही करण्याच्या आधी मत्सराचा कलंक आपल्या जीवनातून कायमचा दूर करावा. कुणाबद्दलही द्वेष, मत्सर, इर्षा बाळगू नका. सत्कार्य करणाऱ्या प्रत्येकाला मदत करण्यासाठी सदैव तत्पर असा. त्रिलोक्यातील प्रत्येक जीवाचे कल्याण होवो, प्रत्येकाचे मंगल होवो अशी कामना करूया. व्यापक बनणे, विशाल दृष्टिकोन ठेवणे, संकुचित क्षेत्रातून बाहेर पडणे, सर्वांशी मिळून मिसळून राहणे, हळूहळू विश्वाशी एकरूप होणे ही आपली अंतिम ध्येय आहेत. प्रेम, सच्चेपणा, धीर, सदभाव याची आज नितांत आवश्यकता आहे. आपल्याला प्रबल कर्मयोग हवा हृदयात अदम्य साहस, अनंत बल हवे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ७ कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक शुक्ल /शुध्द ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. २९ ऑक्टोबर २०२५
★ संत जलाराम जयंती
★ १८९७ जर्मनीचे चॅन्सेलर व नाझी नेते हिटलरचा सहकारी जोसेफ गोबेल्स यांचा जन्मदिन
★ १९११ हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक, वृत्तपत्र क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणार्यांना देण्यात येणार्या पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक जोसेफ पुलित्झर यांचा स्मृतीदिन
★ १९८५ भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग यांचा जन्मदिन
★ जागतिक इंटरनेट दिन.
