
नाशिक (प्रतिनिधी )ता.28 माणसाच्या भावना व वेदना शब्दातुनच आयाम प्राप्त करतात. असे प्रतिपादन मलेका शेख सय्यद यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठान च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारक येथे आयोजित पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमात 196 पुष्प गुंफताना आयाम या पुस्तकावर मलेका शेख सय्यद ऐसपैस गप्पा करत होत्या.
अलकाताई दराडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
मलेका शेख सय्यद पुढे म्हणाल्या की,
कवीता रसिकाच्या अंतर्मनाचा ठाव घेणारी असली पाहिजे. कविता ही सर्वा पर्यत पोहचली पाहिजे. कोरोना काळात तयार झालेल्या शब्दात मांडलेल्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला असुन मन हेलावते तेव्हा वेदना आणि भाव यांचा मेळ तयार होतो. वाचकांच्या मनावर अधोरेखित झालेल्या कविता कोरोनात बळी पडलेल्या आणि कोरोना योद्धा अशा दोन बाजु समजून घेऊन आयाम कवितचा जन्म झाला. मनाची घालमेल,आणि बिकट परिस्थिती मध्ये बळीराजाही सुटला नाही. त्याला ही या संकटाला समोरे जावे लागते. सांजवेळ,बापाची ममता,जगु कस माणसांना,शेतकरी बाप माझा, लेक,मेहदी,होळी,अशा कवितांमधून त्यांनी सामाजिक, स्रीवादी,शेतकरी अशा विविध विषयांवर कविता मधून सहज सुलभ पणे मांडण्याचा प्रयत्न केला.
यावेळी,रवीकांत शार्दूल, सुरेश वाघचौरे या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले.
सुरेश पवार यांनी सुत्रसंचालन केले तर अरुण घोडेराव यांनी आभार मानले.
दरम्यान येत्या शुक्रवारी 31आक्टोबर रोजी कैलास सलादे दाहकता या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
