
नाशिक ,( प्रतिनिधी ) मालेगाव येथील विख्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कवी, लेखक संजय मुकूंदराव निकम यांनी विविध क्षेत्रातील दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना त्यांच्या विशेष कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन आंतरराष्ट्रीय सरस्वती साहित्य समिती भारत या संस्थेने संजय मुकूंदराव निकम यांची आंतरराष्ट्रीय सरस्वती साहित्य समितीच्या कार्यकारिणीत नाशिक जिल्हा संयोजक पदी निवड केली.अध्यक्ष आरती शुक्ला यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कवी लेखक आणि समीक्षक संजय मुकुंदराव निकम यांना याबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या.सचिव प्रिया ठाकूर आणि कार्यकारी सदस्यांनी आणि देश विदेशातील साहित्य रसिकांनी आणि नागरिकांनी या बद्द्ल संजय निकम यांना शुभेच्छा संदेश पाठवले आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
