
ईगतपुरी तालुका (प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन) महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्यां बहुप्रतिक्षीत निवडणुका आता कधीही लागणार असुन, या निवडणुका महायुती वा आघाडी करुन लढवु नये,तर त्या स्वबळावरच लढवाव्या असा सुर सर्वच घटक पक्ष कार्यकर्त्यामध्ये आहे. वरिष्ठ पातळीवर मागील काही वर्षात राजकीय उलथापालथ तथा नाटयमय घडामोडी होऊन काही चित्रविचित्र आघाडी व महायुती तडजोडी करुन जन्मास आल्या आहेत. वरिष्ठ पातळीवर हे ठिक आहे. मात्र स्थानिक पातळीवर वरील तडजोडी लादु नये.सामान्य कार्यकर्त्यानां स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातुनच पाच वर्षानीं एकदा नशिबाने संधी मिळते.मात्र महायुती, आघाडी होऊन तडजोडी झाल्यामुळे ही संधीही कमी होते.यातुन कार्यकर्ता निराश होऊन त्याचे मनोबल खचते, अशी खंत व्यक्त करत स्थानिक पातळीवर कार्यरत महायुती व महाविकास आघाडीतील बहुसंख्य कार्यकर्त्यानीं महायुती वा महा विकास आघाडी नकोच.त्या ऐवजी स्वबळ आजमावे, अशा खाजगीत प्रसारमाध्यमांशीं बोलतानां प्रतिक्रिया दिल्या आहेत. आप-आपल्या भागात पक्ष रुजवणे,वाढवणेसाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्ता हा नेहमी संघर्ष करत स्वत;चे जीवन खपवत असतो.त्यास या निमित्ताने स्थानिक पातळीवर सत्ताकारण करण्याची हौस वा स्वप्न असतेच.पण या तडजोडी मुळे त्यांस मिळणारी संधीही हिरावली जाणार असेल तर मग तो पक्षाचे काम तरी का व कसा करेल ? शिवाय ज्याच्याबरोबर संघर्ष केला,त्याचेशीच मारुन मुटकुन दोस्ती करावी लागतेय नाईलाजाने.यामुळे सामान्य कार्यकर्त्याची कोंडी होते. ही सगळी वस्तुस्थिती लक्षात घेऊन महायुती वा आघाडी करु नये अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत.
