
राजेंद्र सोमवंशी, वृंदा देशमुख, सुरेखा गणोरे, ना. माणिकराव कोकाटे, हेमंत देशमुख, उन्मेष गायधनी, शिवाजी म्हस्के आणि संजय भालेराव.
नाशिकरोड:-( प्रतिनिधी )”राज्य शासन मराठी भाषेच्या संवर्धनाबाबतीत संवेदनशील आहे. महायुती सरकारनेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, त्यामुळे मराठीच्या प्रसारासाठी उपयुक्त पावले उचलण्याचे धोरण ठरले आहे. त्यातील एक भाग म्हणून मंत्रिमंडळाने तुमच्या महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिकरोडला शासकीय भूखंड मंजूर केला आहे. आता त्या जागेवर लवकरात लवकर भव्य साहित्य संकुल उभारा” असे प्रतिपादन क्रीडा व युवा कल्याण मंत्री ना. ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. शाखेला भूखंड वाटप केल्याबद्दल त्यांचे ऋणनिर्देश विशेष स्मृतिचिन्ह देवून हेमंत देशमुख यांनी केले. यावेळी अध्यक्ष उन्मेष गायधनी, प्रमुख कार्यवाह शिवाजी म्हस्के, कार्यवाह रेखा पाटील, कार्यकारणी सदस्य सुरेखा गणोरे व वृंदा देशमुख, सभासद राजेंद्र सोमवंशी व संजय भालेराव आणि सीमा कोकाटे आदी उपस्थित होते.
