
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०७२ वा दिवस
आपल्याला दुसऱ्या मानवजार्तीपासून खूप खूप शिकायचे आहे. जो माणूस म्हणतो की मला शिकण्यासारखे आणखी काही नाही, तो मरण्याच्या वाटेला लागला आहे असे समजावे. जी मानवजात म्हणते की आम्ही सारे काही जाणून घेतले आहे त्या मानवजातीची अवनती अगदी उंबरठ्याशी येऊन ठेपली आहे म्हणून समजावे. 'जोवर जगेन तोवर शिकेन!' पण हे बघा, लोकांपासून जे काय शिकायचे, घ्यायचे ते सारे आपल्या स्वत:च्या साच्यात घालून आपल्या घाटाचे करून घेऊन मगच घ्यायचे एवढे मात्र लक्षात ठेवायला हवे. आपले अस्सल जे काही आहे ते नेहमी कायम राखून मग लोकांपासून काय ते शिकायला हवे.
*स्वामी विवेकानंद...*
‘विकसित व्हावे अर्पित होऊन जावे’ याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगिनी निवेदिता यांचे स्फूर्तीदायी चरित्र ! भगिनी निवेदिता हे नाव उच्चारताच त्यांनी भारतात केलेल्या लोकविलक्षण कार्य, त्यांचा असिम त्याग, संपूर्ण समर्पणता आपल्या देशवासीयांप्रती असलेली अपार करुणा आणि त्यातून उभे राहणारे लोकसेवेचे उत्तुंग कार्य आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. त्यांनी महिला शिक्षणासारख्या सामाजिक क्षेत्रात तर मोठं कार्य केले. त्यांची बुद्धिमत्ता, हिंदू धर्मावरील व भारतावरील निष्ठा, ध्येयवादी वृत्ती आदी गुणविशेषांमुळे त्या भारतीयांच्या कायमच्या आदरास पात्र ठरल्या आहेत.
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ६ कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक शुक्ल /शुध्द ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. २८ ऑक्टोबर २०२५
★ १६३६ अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची स्थापना
★ १८६७ स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, मूळच्या आयरिश मागरिट एलिझाबेथ नोबल उर्फ भगिनी निवेदिता यांचा जन्मदिन
★ १९०० जर्मन विचारवंत मॅक्समुल्लर यांचा स्मृतीदिन
★ १९५५ मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचा जन्मदिन
★ १९५८ महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्य व उद्योगमंत्री अशोक चव्हाण यांचा जन्मदिन
★ आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन.
