
नाशिकरोड:( प्रतिनिधी)-विहितगाव येथील श्री दत्त पेट्रोलियमचे बापू वावरे म्हणजे अवलिया व्यक्तिमत्त्व. समाजसेवी असणाऱ्या वावरे यांनी अनेक गरजूंना सातत्याने मदत करत त्यांच्या दुःखावर फुंकर घातली आहे. यंदाही त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एका दिव्यांग भगिनीला सायकल भेट देत आपला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. विश्वगुरू सामाजिक संस्था आणि श्रीदत्त पेट्रोलियम यांच्या वतीने वावरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक रोड येथील दिव्यांग भगिनीला ही सायकल प्रदान करण्यात आली. त्यामुळे या भगिनीचे मनोबल पक्के होऊन त्यांना समाजात जगण्यासाठी एक नवीन संधी उपलब्ध झाली आहे. तसेच सामाजिक- कौटुंबिक कार्यक्रमाला जाण्याबरोबरच बाजारातही फिरता यावे. तसेच छोटामोठा व्यवसाय करता यावा, म्हणून वावरे यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविल्याबद्दल सर्व उपस्थितांसह ज्येष्ठांनी त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी त्यांना आशीर्वाद दिले आहेत.
