
माणके ( प्रतिनिधी) आज दिनांक २७/१०/२०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानके येथे ‘माझी शाळा माझा अभिमान’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री मा.ना.दादाजी भूसे यांच्या प्रेरणेने तसेच नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.ओंकार पवार यांच्या संकल्पनेतून माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक श्री. प्रल्हाद शांताराम देवरे हे होते.यावेळी उपस्थित माजी विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. हंसराज देसाई यांनी केले. यावेळी नवनियुक्त मुख्याध्यापक श्री.हंसराज देसाई यांचे स्वागत करण्यात आले.तसेच या शाळेतून बदलून गेलेले शिक्षक योगेश शेवाळे, दिपाली शिंदे यांना बदलीनिमित्त निरोप देण्यात आला.’माझी शाळा ,माझा अभिमान’ या उपक्रमाची पार्श्वभूमी व शाळेच्या भौतिक गरजांविषयी मुख्याध्यापकांनी माहिती दिली. तसेच भविष्यात शाळेसाठी करायचे विविध उपक्रम व सुधारणांसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.सदर उपक्रमास सर्व उपस्थित यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत आजच्या या प्रसंगी लगेचच सेवानिवृत्त शिक्षक श्री.प्रल्हाद देवरे सर यांनी अकरा हजार रुपये व सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.आधार देवरे सर यांनी पाच हजार रुपये असे रोख सोळा हजार रुपये जमा केले.तसेच सनदी लेखापाल श्री.नरेंद्र देवरे सर पाण्याच्या टाकीसाठी पंधरा हजार रुपये जाहीर केले. यासोबत अजून मदत करण्याचे आश्वासन उपस्थितांनी केले.या स्नेह मेळाव्याला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बंडू अंतापुरकर, आत्माराम दळवी,मा. सरपंच स्वप्निल देवरे, प्रवीण येवले, अनिल महाले, खुशाल बत्तीशे,सयाजी खैरनार, सागर झोडगे, समाधान देवरे, आनंदा देवरे,भारत सोनवणे, कोमल रौंदळ, मधुकर खैरनार, प्रफुल्ल दळवी,गोकुळ पवार, किशोर देवरे, भूषण बत्तीशे, मनोज रौंदळ यांचेसह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.आभार योगेश शेवाळे सर यांनी मानले.
