
नाशिक रोड ( प्रतिनिधी ):महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा नाशिकरोड आयोजित लोकप्रिय संवाद सृजनाशी या लोकप्रिय कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या पर्वातील एकोणतीसावे पुष्प सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. मंगला वरखेडे गुंफणार आहेत. हा कार्यक्रम गुरूवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ६.०० वाजता, ऋतुरंग सभागृह, दत्त मंदिर चौक, नाशिक रोड येथे होणार आहे.डॉ. वरखेडे आपला वैविध्यपूर्ण साहित्य प्रवास या प्रसंगी उलगडून सांगणार असून, त्यांच्या ओघवत्या शैलीतील मांडणी साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. बालसाहित्य आणि स्त्रीसाहित्य या क्षेत्रात त्यांचे विपुल योगदान आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळासाठी त्यांनी अनेक दर्जेदार पुस्तकांचे संपादनही केले आहे.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष उन्मेष गायधनी, उपाध्यक्ष रवींद्र मालुंजकर, प्रमुख कार्यवाह शिवाजी म्हस्के, कार्यवाह रेखा पाटील, कोषाध्यक्ष दशरथ लोखंडे, तसेच मिलिंद गांधी, हर्षल भामरे, कामिनी तनपुरे, सुरेखा गणोरे, वृंदा देशमुख, कांचन पवार यांनी पुढाकार घेतला आहे.साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सृजनशील संवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
