
नांदगाव (प्रतिनिधी )मित्रमिलन स्नेहसंमेलनात जुन्या आठवणींना उजाळा .
पोखरी -पाटोदे ,तालुका -नांदगाव. जिल्हा- नाशिक येथील माऊली माध्यमिक विद्यालयाचे 2013 2014 चे माजी विद्यार्थी उपस्थित रविवार दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी उत्साह पूर्ण वातावरणात मित्रमिलन स्नेहसंमेलन पार पडले .या संमेलनात जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी एकत्रितपणे आनंदाचे क्षण अनुभवले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. अश्विनी कदम, तसेच दिपाली बराठे,यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे.झेड. बोरसे सर. होते. स्वागत पर भाषणानंतर उपस्थित सर्व मित्रांनी आपले अनुभव शालेय दिवसाच्या आठवणी तसेच जीवन प्रवासातील प्रेरणादायी प्रसंग सांगितले. हास्य विनोद गप्पा आणि जुन्या आठवणी या निमित्ताने सगळ्यांमुळे वातावरण भाऊक झाले होते. त्यानंतर शाळेचे श्री घोडके सर, यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. कार्यक्रमाचे आयोजन अश्विनी कदम. दिपाली वराठे .प्रियांका जाधव. यांच्या पुढाकाराने करण्यात आले.आयोजनात सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा लवकर भेटायचे ठरवत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक तसेच कदम सर बोरसे मॅडम जे.पी.निकम मॅडम. घोडके सर. संजय वाकचौरे. आणि ऋषिकेश सुरसे .सर्व उपस्थित होते. आणि कार्यक्रमाच्या शेवटी घोडके सर. यांनी सुंदर माझी शाळा ही कविता सादर केली .या बेचने शाळेला एक टेबल मधून खुर्च्या कृतज्ञतेने सप्रेम भेट दिलेत. या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
