
नांदगाव (गणतंत्र न्यूज)
जय जिनेंद्र 🙏🏻
जय एकता 🙏🏻
आज नांदगाव शहरात सकल जैन समाजाच्या वतीने पुन्हा एकदा जैन एकतेचा भव्य आणि प्रभावी असा परिचय घडवण्यात आला. पुणे येथील HND हॉस्टेलचा सौदा रद्द करण्यासाठी समाजाच्या एकजुटीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले.या मोर्चात शासनाच्या वतीने नायब तहसीलदार श्री. देवेंद्र कुरे यांनी समाजाचे निवेदन स्वीकारले. हे निवेदन सकल जैन समाजाचे प्रतिनिधी श्री. नुतन कासलीवाल, दतराज छाजेड, राजेश कवडे, राजेश बडजाते, विजय चोपडा, अरुण पाटील, सागर हिरे, चंचल गंगवाल, संजय लोव्हाडे यांच्या हस्ते सादर करण्यात आले.या वेळी नांदगाव शहरातील सर्व जैन संस्थांचे पदाधिकारी, श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही खरी समाजाची सामूहिक शक्ती होती!जैन मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत सर्व समाजबंधूंनी पायी चालत एकतेचा संदेश दिला. मार्गावर ‘जय जिनेंद्र, जय एकता’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.यानंतर सभेचे आयोजन करून मोर्चाचा समारोप करण्यात आला. समाजाच्या महिला आणि पुरुषांनी दिलेला सहभाग या आंदोलनाच्या यशाचा मुख्य आधार ठरला.माध्यमांनी या ऐतिहासिक मोर्च्याला दिलेले उत्कृष्ट कव्हरेजही विशेष उल्लेखनीय आहे.ज्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन या आंदोलनात सहभाग घेतला, त्यांचे मनःपूर्वक आभार व क्षमायाचना!आगामी काळातही आपल्या सहकार्याची अशीच अखंड साथ लाभो, हीच मंगल कामना. 🙏🏻सकल जैन समाज, नांदगाव
