
चिमूर ( योगेश मेश्राम प्रतिनिधी) चिमूर नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात नावाजलेली असलेली शंकरपूर ग्रामपंचायतने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सरपंच भाऊबीज योजना अमलात आणली असून या योजनेअंतर्गत सहाशे एकोणवीस लाभार्थ्यांना मानधनाचे वाटप करण्यात आलेले आहे भाऊबीजेच्या दिवशी गुजरी चौकात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमा चे उद्घाटन जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजुकर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खनिकर्म विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ .अविनाश वारजुकर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच साईश वारजुकर उपसरपंच अशोक चौधरी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष भाऊराव बावनकर उपाध्यक्ष दुर्योधन तांबरभोगे मनिषा मून धनराज मुन ग्रामपंचायत सदस्य सविता चौधरी नितीन सावरकर निखिल गायकवाड रंजना उइके बेबी डहारे वंदना सहारे गोकुल सावरकर पिंटू शेरकी सचिन रासेकर राम शेरकी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात १४७ विधवा महिला ४५अपंग महिला ६५वर्षावरील वरील ४१७महिलांना पाचशे रुपये रोख स्वरूपात मानधन देण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन विजय गजबे प्रास्ताविक व आभार आमोद गौरकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्राम अधिकारी केशव गजभे ग्रामपंचायत कर्मचारी सादिक शेख रवींद्र राखडे बाळा ढोक सचिन निकुरे राजू बघेल यांनी परिश्रम घेतले.याच कार्यक्रमात गावकऱ्यांना कीर्तनस्वरूपी ज्ञान देण्यासाठी पुण्याहून बाल कीर्तनकार ह भ प माऊली महाराज जऊळकर यांचे कीर्तन ठेवलेले होते या बाल कीर्तनकाराणे आपल्या वाणीने लोकांचे लक्ष वेधून घेतलेले होते.वसुंधरा योजने अंतर्गत घरगुती गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आली होती त्यात प्रथम बक्षीस नरेंद्र आदमाने द्वितीय निकिता शहारे तृतीय वैष्णवी पकडून प्रोत्साहन महादेव शेरकी सारिका समर्थ यांना देण्यात आले .
