
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०७१ वा दिवस
राजयोगाच्या साऱ्या शिकवणुकींचा उद्देश आहे, मन एकाग्र करणे, नंतर या एकाग्र मनाने त्याच्याच अगदी आतल्या कप्प्यात काय चालले आहे हे शोधणे, नंतर तिथे जे काय गवसते त्यावरून काही सामान्य निष्कर्ष काढणे आणि अखेर तदनुसार स्वतःच एखादा सिद्धान्त बसविणे. म्हणूनच, तुमचा धर्म कोणता हा प्रश्न राजयोग तुम्हाला कधी विचारीत नाही तुम्ही आस्तिक असा की नास्तिक असा, ख्रिश्चन असा, ज्यू असा की बौद्ध असा, त्याला काहीच हरकत नाही. राजयोगाच्या दृष्टीने त्याला काहीच महत्त्व नाही. तुम्ही मनुष्य आहात ना मग राजयोगाच्या दृष्टीने तेवढेच पुरे, प्रत्येक मानवाला धर्माचा लाभ करून घेण्याचा अधिकार आहे आणि तशी शक्ती पण प्रत्येक मनुष्याच्या ठायी वसत आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ५ कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक शुक्ल /शुध्द ६
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. २७ ऑक्टोबर २०२५
★ १७९५ श्रीमंत पेशवे सवाई माधवराव यांचा स्मृतीदिन
★ १८७४ कवी भास्कर रामचंद्र उर्फ भा. रा. तांबे यांचा जन्मदिन
★ १९०४ स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक जतिंद्रनाथ तथा जतिन दास यांचा जन्मदिन
★ १९२० भारताचे दहावे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचा जन्मदिन
★ १९४७ महाराष्ट्रातील समाजसेवक, बाबा आमटे यांचे चिरंजीव डॉ. विकास आमटे यांचा जन्मदिन.
★ १९६४ सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचा स्मृतीदिन
★ जागतिक दृकश्राव्य वारसा दिन.
