
सिन्नर ( प्रतिनिधी ) संत नामदेव महाराज हे वारकरी परंपरेतील एक महान संत व समाजसुधारक होते.आपल्या अभंगवाणीतुन त्यांनी समाजात समानता प्रेम व मानवतेचा दिप प्रज्वलीत केला.
असे प्रतिपादन सागर भालेराव यांनी केले.
येथील शिंपी समाजाच्या मंदिरात आयोजित केलेल्या संत नामदेव महाराज शिंपी समाज वारकरी मंडळ व महामित्र परिवाराच्या वतीने आयोजित संतशिरोमणी नामदेव महाराजांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
शिंपी समाजाचे अध्यक्ष संजय चांडोले अध्यक्षस्थानी होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून महामित्र दत्ता वायचळे.. नामदेवराव कोतवाल डॉ आर टी जाधव सुनिल कु-हे आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

संत नामदेव महाराजांनी अभंगातुन व किर्तनातुन समाजाला प्रबोधनाची दिशा दिली.. त्यातुन ते फक्त विचारवंत व समाजसुधारकच नव्हते. तर मानवतेचे खरे संदेशवाहक होते.
शिख धर्मग्रंथ असलेल्या गुरू ग्रंथसाहिबा मध्ये त्यांच्या ६२ ग्रंथाचा सहभाग आहे.. यावरून त्यांच्या भक्तीचा व विचारांचा जागतिक प्रभाव दिसून येतो..असे मत महामित्र दत्ता वायचळे यांनी व्यक्त केले.
नामदेव महाराजांच्या अभंगातुन आपल्याला समता करूणा आणि मानवतेचा संदेश मिळतो.असे नामदेव कोतवाल यांनी यावेळी सांगितले.
संजय चांडोले यांनी संत नामदेव महाराजांच्या कार्याला उजाळा दिला.
प्रास्ताविक सुनिल कु-हे यांनी केले.
मधुसूदन वारे.सोमनाथ अवसरकर.योगेश गणोरे.नंदकुमार खर्डे. नंदु गायकवाड.नंदु चव्हाण.ऊध्दव माळी.योगेश खर्डे.आदी उपस्थित होते.
सोमनाथ अवसरकर यांनी सुत्रसंचलन व आभार मानले.
