
सिन्नर ( प्रतिनिधी ) २६ ऑक्टोबर २०२५ क्रांतिकारक सत्तु मराडे यांच्या स्मृतिदिन महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले*कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिकारक सत्तु मराडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले*यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की* या ब्रिटिश राजवटीत गोरगरीब आदिवासींवर सावकराकडुंन होणाऱे अन्याय अत्याचार पाहुन सतुजी मराडे यांचे मन कळवळायचे. यामुळे सत्तू यांच्या मनात ठिनगी पेटली. तो पेंटून उठला.

महादेव कोळयाच्या वाड्या-वस्त्या जाऊन त्याने तरुणांची मनात सावकारशाही च्या अन्याय अत्याचार विरोधात पेटवली.जिवाला जिव देणारी टोळी त्याने तैयार केली.बंदूका,काडतुस त्यांन जमवली.”हर हर महादेव” अशी गर्जना करत त्यानं सावकार शाही विरोधात दंड थोपटून बंडत सामिल असलेले साथीदार.मारुती पेवजी आढळ , गोविंदराव सुपा,दगडू गोपाळ शिंदे,काशीबा बूढ़े,या सारख्या माणसांची चिरेबंद फ़ौज़ त्यानी तयार केली.. त्यांनी कधीच आया बहिनी ना त्याने त्रास दिला नाही नेहमीच त्याचा.गळ्या काडतुसाचा पट्टा,खांद्यावर बंदूक आणि कमरेला तलवार लटकवुन दिसायची सत्तु मराडे दिवसाधवल्या सारकराच्या घरी बेधड़क जायचा.पैसे घ्यायचा आणि गोर गरीबाना वाटायचा.पण एकदा फितूरीमूळ पकडला गेला.आणि मुरबाड जवळील टोकावड्याच्या लॉकअप मधे ठेवला.परंतु दुर्दैव पोलिसांच् हां रांगडा गडी बुद्धीच्या जोरावर पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाला त्यानंतर सत्तु मराडे.यांनी अनेक ठिकाणी त्यानी अहमदनगर, नाशिक-ठाणे-रत्नागिरी-कोल्हापुर-कराड-सातारा असा फिरत फिरत क्रांतिसिंह नाना पाटला ला जावुन सामिल झाला.पण तिथ मन रमेना म्हणून ते पुन्हा आम्बेगाव खेड ह्या आपल्या भागात आले..पुन्हा सत्तू आणि त्याचे सहा साथीदार ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड सुरू केली पण पुन्हा एकदा फितूरीमूळ सत्तु आणि त्याचे सर्व साथीदार ब्रिटिश त्याना पाडले त्याला १० वर्षाची सजा झाली.त्यापैकी ५ वर्षाची माफ़ झाली. १९५०मधून तो पुण्याच्या येरवडा जेल मधून सुटला.खर तर १९४७चा देश स्वतंत्र झाल्यावरच त्याची सन्मानान सुटका व्हायला हवी होती.परंतु तो होता गरीब ‘आदिवासी महादेव कोळी’.वैयक्तिक स्वार्थ साठी अनेक दरोदेखोर आज स्वतंत्र सैनिकाच्या मानधनाचे मानकरी ठरले.आणि सत्तू मराडी हा मृत्यु च्या अखेरच्या श्वासा पर्यन्त दारिद्र्यात दिवस काढले.अखेर १९९६ साली काळाने त्यांच्यावर झड़प घातली वयाची शंभरी पार केली सर्व घरादाराला आदिवासी समाजाला दुःख सागरात लोटून अनंतात विलीन झाले.. अशा या महान क्रांतिकारकास विनम्र अभिवादन*या कार्यक्रमाचे सुञसंचलन रुपेश मुठे यांनी केले.तर प्रास्ताविक विजय मुठे यानी केले.व रमेश गोंदके आभार यानी मानले* याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे माजी नगरसेवक रूपेशभाऊ मुठे सुनिल सावंत,रमेश गोंदके,रामेश्वर पाचोरे, सुनिल रेवगडे शाम डांगे, किरण मुठे,रोहित मुठे,राकेश सोनवणे आदी.उपस्थित होते
