
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन-
ईगतपुरी तालुक्यातील खंबाळे (शिरसाटे) जिल्हा परिषद गटातुन राष्ट्रवादी कॉग्रेंस पक्षाकडुन म्हसुर्ली गावचे माजी सरपंच व युवा नेते जगन्नाथ शिवाजी पोटकुले यांनी आपली उमेदवारीची इच्छा जाहिर केली आहे.
जगन्नाथ पोटकुले यांचे तब्बल वीस एक वर्षापासुन म्हसुर्ली ग्रामपंचायतीवर वर्चस्व असुन सातत्याने ते या गावचे सरपंच आहेत.आपल्या सरपंच पदाचे माध्यमातुन आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, माजी जि.प.सदस्य गोरख बोडके, अँड.संदिप गुळवे आदीचें सहकार्याने त्यांनी गावाचा विकास केला असुन आदर्श सरपंच व आदर्श गाव आदि पुरस्कारही त्यांना प्राप्त आहेत.
पोटकुले हे स्थानिक व आदिवासी बांधवातील रमणारे युवा नेते असुन या गटाचा विकास करण्याचा त्यांचा दृढ असा संकल्प आहे.
खंबाळे गट हा आदिवासी बहुल, अतिदुर्गम व मागासलेला भाग आहे .या भागास विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असुन येथे स्थानिक व युवा नेतृत्वाचीच गरज असल्याचे पोटकुले यांनी नमुद केले आहे.
पोटकुले यांचे रुपाने राष्ट्रवादी कॉग्रेसला सक्षम पर्याय मिळाला असुन त्यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी आहुर्ली परिसरातुन जोर धरत आहे.
