
नांदगाव — मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात कर्मवीर काकासाहेब वाघ यांची जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका ज्योती काळे व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. कर्मवीर काकासाहेब वाघ हे महात्मा फुले आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी बहुजन समाज आणि शेतकरी वर्गातील मुला-मुलींना शिक्षण मिळावे यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. मविप्र संस्थेच्या कार्यविस्थारात त्यांचे महत्त्वाचं योगदान आहे. त्यांनी स्त्री शिक्षणाला विशेष महत्त्व दिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि जंगल लढ्यात सहभागी झाले होते. काकासाहेब १९५७ मध्ये विधानसभा निवडणुकीत आमदार निवडून आले. कर्मवीर काकासाहेब वाघ यांचे कार्य प्रामुख्याने शैक्षणिक, सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अतुलनीय योगदानामुळे जनतेने त्यांना कर्मवीर ही पदवी दिली. भारत सरकारने त्यांना १९७०-७१ मध्ये ‘पद्मश्री’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. या प्रसंगी परसराम सरोदे, संजय पवार, अनिल जाधव उपस्थित होते.
