
ओझर: ( वार्ताहर )जळगाव येथे झालेल्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत १९ वयोगटात केटीएचएम महाविद्यालयाची डिलिजिएंट अकरावी सायन्स शाखेत शिकत असलेली तनिष्का अनिल राठी हिने प्रथम क्रमांक मिळवून तिची सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिचा सत्कार जळगाव बुद्धिबळ संघाचे फारूक शेख, प्रवीण ठाकरे, जिल्हा क्रीडाधिकारी मीनल थोरात यांनी ट्रॉफी चेस बोर्ड देऊन सत्कार केला. तिच्या यशाबद्दल जिल्हा आरोग्या धिकारी डॉ सुधाकर मोरे, तालुका आरोग्याधिकारी डॉ सुजित कोशिरे, प्रा आ के ओझर वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद सुर्वे, डॉ वैशाली कदम, तसेच मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे, प्राचार्य के एम अहिरे, उपप्राचार्य कैलास शिंदे, शिक्षणाधिकारी नितीन जाधव क्रीडा शिक्षक डेरले सर, बापू सोनवणे, हिवताप पतसंस्थेचे विद्यमान डायरेक्टर पल्लवी कुलकर्णी, आरिफ पठाण यांनी अभिनंदन केले. स्पर्धेसाठी तिला ईशान चेस अकॅडमीचे अमित गंगाधर तारे, डी चेस झोनच्या धनश्री अनिल राठी यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या प्रतिनिधींनी तसेच ओझर येथील संजय सारडा, संतोष लढ्ढा यांनी तनिष्काचे अभिनंदन केले आहे.
