
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०७० वा दिवस
हे समस्त विश्व ब्रह्मामधे होते, आणि ते जणू त्यामधून बाहेर फेकले गेले, आणि जेथून ते बाहेर आले त्या आपल्या उगमाप्रत परत जाण्यासाठी ते सारखे मार्गक्रमीत आहे. विद्युज्जनक यंत्रातून वीज बाहेर यावी, आणि फेरा पूर्ण करून तिने फिरून त्या यंत्रात परत जावे, अशासारखा हा प्रकार आहे. जीवात्म्याचेही असेच आहे. ब्रह्मातून प्रक्षेपित होऊन तो नानाप्रकारच्या वनस्पतिदेहांमधून नि पशुदेहांमधून जातो आणि अखेर मनुष्यशरीरात प्रविष्ट होतो; मनुष्य ही ब्रह्माच्या सगळ्यात जवळची अवस्था आहे. ज्या ब्रह्मातून आपण बाहेर पडलो त्याप्रत परत जाणे ही जीवाची फार मोठी धडपड आहे. इंद्रियातीत, अस्पर्श, अरूप, रसातीत, अक्षर, अनंत, अतर्क्य अविनाशी अशा आत्म्याचे साक्षात् ज्ञान झाल्यानेच मनुष्य मृत्यूच्या तावडीतून सुटतो.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ४ कार्तिक शके १९४७
★ कार्तिक शुक्ल /शुध्द ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. २६ ऑक्टोबर २०२५
★ १८९० भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्मदिन
★ १८९१ सहकार चळवळीचे प्रवर्तक वैकुंठभाई मेहता यांचा जन्मदिन.
★ १९३० प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचा स्मृतीदिन
★ १९३७ संगीतकार व गायक हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिन
★ १९४७ जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
★ १९५४ नाट्य आणि चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्मदिन
★ १९९१ स्वातंत्र्यसैनिक, लेखक, पत्रकार, दैनिक ‘मराठवाडा’ चे संपादक, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व हैदराबाद मुक्तीसंग्रामचे नेते अनंत काशिनाथ भालेराव यांचा स्मृतिदिन.
