
निगडोळ:-(प्रतिनिधी ) येथील रयत शिक्षण संस्थेचे मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक या निसर्गरम्य ज्ञानसंकुलाचा संरक्षक भिंतीचा उद्घाटन सोहळा शनिवार दि.२५ ऑक्टोबर २०२५ रोजी विद्यालयात पार पडला.भारतातली अग्रगण्य बैद्यनाथ आयुर्वेदिक औषध कंपनीचे असेट मॅनेजमेंट प्रमुख मा.श्री प्रकाशजी गायकवाड साहेब यांच्या व विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य व दिंडोरी तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष मा.श्री.शरदभाऊ मालसाने यांच्या संयुक्त प्रयत्नाने बैद्यनाथ पावर प्रा.लि.कंपनीच्या माध्यमातून विद्यालयाच्या प्रलंबित संरक्षक भिंतीचे काम पूर्णत्वास येण्याचे विद्यालयाचे स्वप्न अखेर साकार झाले.विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.देवदत्त बोरसे यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यालयाच्या सभाकक्षात सभा आयोजित करण्यात आली.अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या इमारतीसाठी जागा दान देणारे थोर दाते विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन मा.श्री.बबनराव मालसाने दादा होते.प्रमुख अतिथी बैद्यनाथ पावर प्रा.लि.कंपनीचे असेट मॅनेजमेंटचे मुख्याधिकारी श्री.प्रकाश गायकवाड साहेब,गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर मा.श्री.प्रतिक शिंदे होते.याप्रसंगी निगडोळ ग्रा.पं.चे सरपंच मा.श्री.कृष्णा रहेरे,सामाजिक कार्यकर्ते शशिकांत मालसाने विद्यालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य श्री.रमेश मालसाने,उत्तम मालसाने,तुकाराम मालसाने,पंडित मालसाने,संपत मालसाने,संजय मालसाने,शांताराम मालसाने,भाऊसाहेब मालसाने, अनिकेत घडवजे व निगडोळ पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.प्रमुख अतिथींचा शाल,श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते पूजन करून,श्रीफळ व पुष्प वाहून संरक्षक भिंतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुख्याध्यापक श्री.देवदत्त बोरसे यांनी केले व श्री.शरदभाऊ मालसाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.व्ही.ए.देवरे व श्री.तुळशीदास भामरे यांनी अनमोल सहकार्य केले.
