
पोखरी (पा ) ता.नांदगाव जि. नाशिक येथील माऊली माध्यमिक विद्यालयाचे २००१-२००२ चे माजी विद्यार्थी उपस्थितीत शनिवारी वारी (दि. २५ऑक्टोबर २०२५रोजी उत्साहपूर्ण वातावरणात मित्रमिलन स्नेहसंमेलन पार पडले. या संमेलनात जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी एकत्रितपणे आनंदाचे क्षण अनुभवले.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश शिरोडकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष मुख्याध्यापक जे.झेड बोरसे सर होते स्वागतपर भाषणानंतर उपस्थित मित्रांनी आपले अनुभव, शालेय दिवसांच्या आठवणी, तसेच जीवनप्रवासातील प्रेरणादायी प्रसंग मांडले. हास्य-विनोद, गप्पा आणि जुन्या ओळखींची आठवण या सगळ्यामुळे वातावरण भावूक झाले होते

.त्यानंतर शाळेचे शिक्षक रमेश घोडके सर यांनी मार्गदर्शन पर भाषण केले कार्यक्रमाचे आयोजन अर्जुन गायकवाड यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. संयोजनात अर्जुन गायकवाड यांनी व मित्र मंडळीने विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी पुन्हा लवकर भेटायचे ठरवत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात शाळेचे शिक्षक मुख्यध्यापक जे झेड बोरसे सर, रमेश घोडके सर , व्ही व्ही कदम सर शाळेचे कर्मचारी संजय वाघचौरे, ऋषिकेश सुरसे व सर्व माझी विद्यार्थी उपस्थित होते

