
इगतपुरी( प्रतिनिधी) इगतपुरी तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आदिवासीं पाड्यावर दिवाळी साजरी करण्यात आली माजी तालुकाध्यक्ष रवि गव्हाणे यांच्या संकल्पनेतून उभाडे येथील आदीम कातकरी वस्तीवर जावून तेथील बंधूंना मिठाई तर महिला भगिनींना साडीचे वाटप करण्यात आले त्यासोबत घोटी ग्रामपालिकेतील सफाई कामगार महिला भगिनींना देखील साडी व मिठाईचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाळासाहेब सुराणा, तर व्यासपीठावर भाजपा नेते भास्करराव गुंजाळ, उत्तमराव भोसले, अण्णा डोंगरे, मंडळ अध्यक्ष अण्णा पवार मा सरपंच गणेश गोडे, कैलास कस्तुरे, उल्हास गोईकणे, विनोद लंगडे, योगेश सूरुडे, पल्लवी शिंदे,शहराध्यक्ष गोटु कुमट, प्रतिभा काळे, संगिता जाधव शिवानी दासुड पिंटू जोशी, गोकुळ हिलम, सुनिल वाघ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते
