
सुप्रसिद्ध पार्श्वगायक मन्ना डे यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने प्रतिमा पुजन करतांना उपस्थित विद्यार्थी वर्ग व ओमकार संगीत विद्यालयाचे संचालक गुरूवर्य सुनिलजी खांगळ आणि मान्यवर.
मनमाड(प्रतिनिधी)- येथील देवगंधर्व संगीत महाविद्यालय संचलित ओमकार संगीत विद्यालयात सुप्रसिद्ध गायक स्व.मन्ना डे यांचा स्मृतीदिन २४ आॕक्टोबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.गुरुवर्य सुनिलजी खांगळ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात प्रथम प्रतिमापुजन करुन स्व.मन्ना डे यांना अभिवादन करण्यात आले.मन्ना डे यांच्या विविधांगी गायकीचा आढावा यानिमित्ताने ओमकार संगीत विद्यालयाचे संचालक गुरुवर्य सुनिलजी खंगाळ सर यांनी उपस्थितांना प्रास्ताविकातून समजावून सांगितला.
त्यानंतर ओमकार संगीत विद्यालयाचे संचालक सुनिल खांगळ सर,सोनु भुजंग,आर्यन जोगदंड,गणेश गवळी,दीपक खरे,कु.पायल खैरमोडे,अमिता झाडे,जनार्दन देवरे,सी.एम.जोहरे सर इ.नी मन्ना डे यांची
जिंदगी कैसी है पहेली,कस्मे वादे प्यार वफा..,ये भाई जरा देखके चलो,तुझे सुरज कहूँ या चंदा,ये मेरी जोहरा जबी, पुछो न कैसे मैंने रैन बितायी,केतकी गुलाब जुई,तू प्यारका सागर है,लागा चुनरीमें दाग इ.गीते सादर केली.
उपस्थित गायक कलावंत असलेल्या ओमकार संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुश्राव्य गायनाने पार्श्वगायक स्व.मन्ना डे यांना अभिवादन करीत स्मृती जागविल्या,तर मनमाड शहर व परीसरात मन्ना डे यांना अभिवादन करणारा हा पहिलाच कार्यक्रम उल्लेखनीय व संगीतसाधनेस बळ देणारा ठरेल असे मत विद्यालयाच्या कार्यवाहक श्रीमती मिनाताई खांगळ यांनी समारोपप्रसंगी व्यक्त केले.
उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या अभिवादन गीत-गायन मैफिलीचे सूत्रसंचलन गायक व गझलकार सोनू भुजंग व जनार्दन देवरे यांनी केले सी.एम.जोहरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.याप्रसंगी संगीत विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
