
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ पाटिल यांजकडुन*———- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईगतपुरी तालुक्यात वेगवान राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. ईगतपुरी तालुक्यातील पाच जि.प.गटा पैकी घोटी जि.प.गट हा जिल्हयातला राजकीय गरमागरमीचा गट ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वसाधारण असलेल्या या जि.प. गटावर जि.प.चे माजी सभापती उदय जाधव यांचे गेल्या दोन दशकापासुन एकहाती वर्चस्व आहे.त्यामुळे जाधव यांची दावेदारी सर्वाधिक प्रबळ मानली जात आहे.जाधव यांना पर्याय काय अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली ती घोटी कृ.उ.बा. चे माजी सभापती असलेले ज्ञानेश्वर लहाने यांच्या दमदार एंट्रीने. लहाने यांची दमदार एंट्री झाल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्या दिशेने लहाने यांचे समर्थकाकडुन संकेतही मिळत आहे.घोटी शहर भर लागलेल्या शुभेच्छा बँनर मुळे ही चर्चा वाढली आहे.दुसरीकडे अन्य मार्गानींही या दावेदारी चे संकेत मिळु लागले आहेत. यामुळे घोटी जि.प. गटात वर्चस्वाची लढाई सुरु होणार असुन ती चुरशीची व रंगतदार होईल अशी जोरदार चर्चा आहे. आमदार हिरामन खोसकर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे लहाने हे माजी जि.प.सदस्य गोरख बोडके व सहकार नेते तथा माजी जि.प.सदस्य अँड. संदिप गुळवे यांचेही मर्जीतले मानले जात आहे.या सगळयाशीच लहाने यांचा असणारा दोस्ताना हा चर्चेचा विषय आहे.या शिवाय घोटी कृ.उ.बा, खरेदी विक्री संघ व तालुका तालीम संघाचे माध्यमातुन त्यांचे कार्य आहे. या बळावर लहाने हे रिंगणात उतरणार का ? असा सवाल विचारला जातो आहे.लहाने हे या निमित्ताने तगडे स्पर्धक ठरु शकतात. दुसरीकडे ईगतपुरी तालुक्यातील नावाजलेली व भरघोस उत्पन्नाची बाजारपेठ असलेल्या बाजार घोटीवर तब्बल दोन दशके उदय जाधव यांचे एकहाती वर्चस्व आहे.त्या बळावरच जि.प.गटावर ही आहे. उदय जाधव हे स्वत: दोनदा या जि.प. गटातुन निवडुन गेलेले आहेत.तर एकदा त्यांच्या सौभाग्यवती सौ.अलका जाधव या निवडुन गेलेल्या आहेत. अनुसुचित जमातीसाठी राखीव असतानांही जाधव यांचेच समर्थनाचे बळावर माजी आमदार शिवराम झोले यांचे समर्थकाने इथे विजय मिळवलेला होता.त्यामुळे घोटी गट म्हंणजे जाधव हे समिकरण पक्के झाले आहे. दोन दशके हा गट राखण्याची किमया जाधव यांनी केली असुन या बळावर दोघाही पती पत्नीनीं जि.प.सभापती पद ही भोगलेले आहे.शिवाय बाजार घोटी ग्रा.प. वर ही सातत्याने जाधव यांचाच दबदबा राहिलेला आहे. नशिबाने हा गट पुन्हा सर्वसाधारण झाल्याने जाधवाचीं उमेदवारी प्रबळ मानली जाते आहे. तर दुसरीकडे लहाने यांचे एंट्रीने जाधवापुढे पक्षांतर्गतच तगडा स्पर्धक उभा ठाकल्याचे बोलले जात आहे.जाधव व लहाने हे दोघेही एकाच राष्ट्रवादी पक्षाचे असल्याने तिढा वाढणेची चर्चा आहे. नवा चेहरा दयावा असा काहीचां या गटात आग्रह आहे. तर दुसरीकडे यु.पी.त यादव व घोटीत जाधव यानां पर्याय नाही असे गमतीत म्हटले जाते आहे. एकुणच घोटीत उमेदवारी साठी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये चुरस पहायला मिळत आहे तर प्रतिस्पर्धी विरोधी गोटात मात्र शांतता दिसुन येत आहे. तालुक्यात आमदार, खासदार देणारे, विविध नेते, कार्यकर्ते घडवणारे किंगमेकरच्या भुमित सातत्याने असणारे उ.बा.ठा.चे निवृत्ती जाधव यांचा गतवेळी मनसे उमेदवार संदिप किर्वेच्या दमदार उमेदवारीने निसटता पराभव झाला होता.त्याचे उट्टे काढण्यासाछी जाधव हे परत एकदा नशिब आजमावणार ? की महायुतीतील चुरशीचा फायदा उचलुन एखादया नाराज तगडया माशाला गळाला लावुन पुन्हा किंगमेकरची भुमिका बजावणार ? याबाबतही उलट सुलट चर्चा सुरु आहे. घोटी गटातील विजयी उमेदवारास थेट जि.प. अध्यक्षपदाची संधीही असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या गटाचे महत्त्व कमालीचे वाढुन चुरसही वाढली असल्याचे बोलले जाते आहे. दुसरीकडे ईगतपुरी पंचायत समिती सभापतीपद हे अनुसुचित जाती साठी राखीव झाले आहे. या साठीची अनु.जाती राखीव गणाची एकमेव जागा ही घोटी गणातच असल्याने या जागेवरही इच्छुकाच्यां उडया पडल्या आहेत.कारण येथील विजयी उमेदवाराचे गळयात थेट सभापतीपदाची माळ पडणार आहे. भाजप चे येथील माजी पं.स. सदस्य येथुन पुन्हा उत्सुक असतील.पण त्याच बरोबर भाजपचे निष्ठावान अण्णा डोंगरे यांची दावेदारीही प्रबळ मानली जाते आहे.घोटीचे माजी सरपंच मदन रुपवते, प्रशांत रुपवते अशीही नावे चर्चेत आहे. याशिवाय भाजप मध्येच अनेक दिग्गज व निष्ठावान कार्यकर्ते असुन त्यांचीही दावेदारी प्रबळ आहे.या शिवाय घोटी शहरातील अनेक दिग्गज ही स्पर्धेत उतरले आहेत.त्यामुळे या गणात उमेदवाराचीं भाऊगर्दी होणार आहे. महायुती झाल्यास बहुतेक राष्ट्रवादी कॉग्रेंस ला जि.प.गट व भाजपला घोटी गण सुटणार हे जवळपास निश्चीत मानले जाते आहे.अर्थात दावे तिन्ही पक्ष नक्कीच करतील यात शंका नसली तरी तसे प्रबळ उमेदवार त्यांचेकडे नसल्याने बहुतेक हेच जागा वाटप सुत्र राहिल.अर्थात महायुती झाली नाही तर चित्र वेगळे असेल हे जरी खरे असले तरी दोन्ही जाधव व एक लहाने यांचेभोवतीच निवडणुक फिरेल अशी शक्यता आहे. तर घोटी गणास सभापती पदाची संधी असल्याने व मागील सदस्य भाजपाचा असल्याने भाजपचे ही येथे हौसले बुलंद झाले असुन प्रथमच प्रदिर्घ काळानंतर सभापती पदाचे रुपाने ईगतपुरी पंचायत समितीची सत्ता हाती घेण्याची संधी भाजपला चालुन आली आहे.यामुळे भाजप कडे या गणात दावेदारी वाढली आहे. मुंढेगाव गण अनुसुचित जमाती राखीव असुन तो बहुतेक शिंदे शिवसेना गटाला सोडला जाईल अशी चर्चा आहे.
