
.बारागांव पिंप्री (ता. सिन्नर) | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बारागांव पिंप्री येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास माजी विद्यार्थी, पालक उपस्थित राहून शाळेच्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजनानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. नवनाथ हांडगे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. गोरक्ष सोनवणे यांनी शालेय गरजांची सविस्तर माहिती देत माजी विद्यार्थ्यांना मदतीचे आव्हान केले.या प्रसंगी सर्व शिक्षक उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली तसेच शाळेच्या उन्नतीसाठी सहकार्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेंद्र पाटील यांनी केले.
