
नंदुरबार. (प्रतिनिधी) – सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने खांडबारा स. कं. प. कार्यालयात “इडा पीडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे” या घोषणांनी खांडबारा परिसर दुमदुमले. बेलगाडी आकर्षकपणे सजवून त्यावर कृषी सम्राट बळीराजा विराजमान करण्यात आला आणि गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी शेतकरी भावनेने घोषणाबाजी करत “आधुनिक वामन भांडवलदारांच्या रूपात येत आहेत, सावध राहा!” असा संदेश दिला.प्रभोधन सभेत “जल, जंगल, जमीन वाचवा” या प्रभावी घोषणा देत शेतकऱ्यांना एकजूट राहण्याचे आवाहन करण्यात आले. सभेत महात्मा फुले यांनी रचलेल्या “सत्याचा अखंड गायन” चे सामूहिक सादरीकरण करून सत्यशोधक विचारांचा जागर करण्यात आला.या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष कॉ. आर. टी. गावीत मार्गदर्शन करताना म्हणाले की आज शेतकऱ्याचे अतिवृष्टी मुळे कपास, सोयाबीन सह इतर पिके पुनःता हा वाया गेलीत हजारो हेक्टर जमिनी वाहून गेल्या या कडे लक्ष न देता आधुनिक वामन रुपी सरकार शेतकऱ्याची टिंगल टवाळणी करण्यात मग्न आहे. सत्यशोधक ने आवाज उठवताच दिनांक ९/१०/२०२५ रोजी अतिवृष्टी च्या जि आर मध्ये नंदुरबार जिल्हा समाविष्ट करतात, सत्यशोधक च्या मोर्च्याना १४४ कलम दाखवून शेतकऱ्याचा उद्रेक दडपिला जातो आणि इथले सत्तादारी, विरोधक शेतकऱ्याच्या बाजूने कुणीही ब्र शब्द काढत नाही हॆ पहिल्या वर दुसऱ्याच दिवसी जी आर मधून नंदुरबार जिल्हा वगळण्यात येतो आज शेतकऱ्याला आर्थिक बाजूची मदत करण्याची गरज असताना महसूल मंत्री आदिवासी शेतकऱ्याच्या जमिनी भांडवल दाराना फुकटात वाटण्यासाठी कायदे करीत आहे शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवण्याच काम आधुनिक वामन करीत आहे पण याला सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेर्तृत्वा खाली रस्त्यावरची लढाई लढत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बळी राज्याचे लोकशाही प्रणित राज्य आणण्यासाठी लढत राहील आणि आधुनिक भांडवलदरांच्या वामनाला पाताळात गाडण्या साठी शेतकऱ्यांणी एकजूट होणायचे आव्हान केले यावेळी कॉम.किशोर ढमाले, कॉ.रणजित गावीत,यांनी मार्गदर्शन केले तर सेल्या गावीत, दिवाणजी वसावे उत्तम गावीत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी परिश्रम घेतले तरी कृषी सम्राट बळीराजाची वेष भुषा रामू गावीत यांनी साकरली, “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सत्यशोधकांचा लढा सुरूच राहील,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
