
संभाजीनगर (प्रतिनिधी) — भारतीय रेल्वे परिषद संघटनेने (Indian Railway Conference Association) *औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून “छत्रपती संभाजीनगर” असे करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. या बदलासोबत स्थानकाचा कोडदेखील बदलण्यात आला असून, जुना कोड “AWB” रद्द करून नवीन कोड “CPSN” लागू करण्यात आला आहे.*ही मान्यता दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद स्थानकासाठी देण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश आय.आर.सी.ए.कडून (IRCA) ऑक्टोबर २०२५ मध्ये जारी करण्यात आला आहे.आता सर्व रेल्वे नोंदी, तिकिट प्रणाली आणि सूचना फलकांवर औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर (CPSN) हे नाव दिसणार आहे.
