
उपाध्यक्ष :– संजय मुकुंदराव निकम मालेगांव जि नाशिक
मालेगाव (प्रतिनिधी) :दिनांक १२ ऑक्टोबर रोजी मालेगाव येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतची तालुका कार्यकारिणी गठीत करण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा अध्यक्ष हिराजी जाधव यांच्या उपस्थितीत चर्चा पार पडली.जिल्हा अध्यक्षांनी कॅप्टन अशोक सोनवणे यांना तालुका कार्यकारिणी गठीत करण्याची विनंती केली होती. सादर झालेल्या प्रस्तावाचा अभ्यास करून अखेर मालेगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीची मुदत संघटनेच्या नियमांनुसार एक वर्षासाठी निश्चित करण्यात आली आहे.जिल्हा सचिव इंजी. चंद्रकिशोर हुमणे यांनी ही कार्यकारिणी जाहीर करत सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आणि आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
—मालेगाव तालुका कार्यकारिणी
(अ.भा. ग्राहक पंचायत)
अध्यक्ष: कॅप्टन अशोक जगन्नाथ सोनवणे
उपाध्यक्ष: संजय निकम, निलेश पाटील
सचिव: मिलिंदराव पाटील
सहसचिव: साहेबराव बोरसे, राहुल जाट
कोषाध्यक्ष: ॳॅड. जाई बच्छाव
सहकोषाध्यक्ष: महेश देवरे
प्रसिद्धी प्रमुख: ॳॅड. जयवंतराव पाटील
सदस्य:
1. ॳॅड. कल्पना जाधव
2. ॳॅड. गीता बाफना
3. ॳॅड. सुनीता दोडे
4. प्रा. श्वेता सोनवणे
5. राकेश परशुराम पाटील
6. गणेश संजय अहिरे
7. जयवंतराव पाटील
तालुका अध्यक्ष कॅप्टन अशोक सोनवणे आणि संपूर्ण कार्यकारिणीचे हार्दिक स्वागत तसेच ग्राहक जनजागृतीसाठी पुढील कार्यास शुभेच्छा!
