
नाशिक (.प्रतिनिधी ) प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द व मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश 100% प्राप्त होणारच. गिरणा गौरव प्रतिष्ठान, मा सुरेश पवार आयोजित पुस्तकावर बोलू काही.. कार्यक्रमात सक्सेस फॅक्टरी ह्या पुस्तकाचे लेखक विशाल पाटील यांचे विचार.

आजच्या या AI, सोशल मीडियाच्या. युगात – काळात विद्यार्थ्यांनी , कॉलेज तरुण तरुणींनी जागतिक स्तरावरील राजकीय, व्यावसायिक जे यशस्वी लोक आहेत किंवा लीडर आहेत त्यांचा तरुणांनी खोलपणे सखोल अभ्यास करायला हवा, त्यासाठी तुम्ही प्रचंड, सखोल विविध स्तरातील ग्रंथांचे वाचन करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आपल्या मनातील जे काहीही विचार असतील तर हे रोज तुम्ही काही ना काही एका डायरीमध्ये लिहून ठेवत चला. आणि हे बघा मी जे हे सक्सेस फॅक्टरी नावाचे पुस्तक लिहिलेले आहे त्याची निर्मिती ही एकदा निसर्ग भ्रमंती करीत असता तिथे वाचन करताना सुचलं.. की आपणही तरुणांना मार्गदर्शक ठरेल, असे पुस्तक लिहावे, असा विचार मनात आला. अगोदर ते पुस्तक माझ्या मनात, माझ्या विचारात, मेंदूत , निर्माण झालं. नंतर त्याची रूपरेषा आखणी, जसे मुखपृष्ठ, dtp typing ईची रूपरेषा आखल्यानंतर पुन्हा मी त्याचे ड्राफ्टस तीन स्वरूपात लिहिले, फायनल ड्राफ्ट तयार झाला, त्यानंतर डी टी पी टायपिंग इतर काही मुखपृष्ठ रचना, पब्लिकेशन ई बऱ्याच काही अडचणी आल्या होत्या. परंतु आपण जर जिद्दीने कामावर लक्ष केंद्रित केले तर कोणतेही काम, प्रोजेक्ट पूर्ण करून यशस्वी होऊ शकतो.—- Chase your Dreams – Never Give up – ज्यावेळी आपण एखादे ध्येय, goal 🥅 Dream , स्वप्न बघतो , व ते पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतो, त्यावेळी आपल्याला नक्की दिशा सापडत नसते, व आपली मेहनत वाया जाते. असे का होते. .

आपल्याकडे वेळेला मर्यादा आहे तसेच शारीरिक श्रम व बौद्धिक क्षमतेलाही मर्यादा आहे. आपण अनेक छोट्या छोट्या कामावर उगाच आपले श्रम वाया घालवत असतो, अशा निरर्थक कामे बाजूला सारा व आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आपल्या आजूबाजूला यशस्वी व्यक्ती शी संपर्क करून त्यांच्या सान्निध्यात राहून त्यांच्या यशाचे रहस्य काय आहे? याचा अभ्यास करा. त्यावेळी तुमच्या असे लक्षात येईल की ह्या यश प्राप्त केलेल्या व्यक्तींनी स्वप्न अथवा ध्येय Target हे सुरुवातीलाच छोटे पाहिले नव्हते तर त्यांनी उत्तुंग हिमालयाला गवसणी घालण्याचेच स्वप्न बघितले होते व ते पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे योग्य असे नियोजन होते. त्यांना भले बऱ्याचदा अपयशाला ही तोंड द्यावे लागेल होते, परंतु जिद्द, प्रयत्न चिकाटी, मेहनत, दृढ निश्चय व संयम बाळगून त्यांनी आपले आपल्या ध्येयाकडे अविरत वाटचाल चालूच ठेवली, व यशप्राप्ती केली, अनेकदा बऱ्याचदा यश त्यांना हुलकावणी देऊन ही गेले, परंतु असे यशस्वी लोक कधी हार मानित नाही. अपयशातूनही काही धडे आपल्याला शिकायला मिळतात . व त्याचे भविष्यात चांगले परिणाम होतात. स्वप्न बघतांना उत्तुंग स्वप्न बघा. एखादी टेकडी पार पाडण्याचे शेखचिल्ली स्वप्न न बघता, हिमालयावर उत्तुंग शिखरावर स्वार होण्याचे च ध्येय उराशी बाळगून ठेवा. व सातत्याने प्रयत्न करत रहा. भले सुरुवात लां छोटे छोटे पाऊल उचला, व चालत रहा.. त्यामुळे वाटेत येणारे खाच खळगे, उन, वारा, पाऊस, चढ उतार यांचा अनुभव मिळेल. व एक दिवस खरेच तुम्हाला अचंबित करणारे परिणाम बघून तुम्हीही थक्क व्हाल. ह्या क्षणाला तुम्ही यशाच्या उत्तुंग, महाकाय हिमालयावर ( mount ए्हरेस्टवीर ) व्ह्या शिखरावर स्वार झालेले असाल. यश तुमच्या पायाशी लोळण घेत असेल. कधी यश हे हुलकावणी ही देऊन जाते. यशाचा हा मूलमंत्र नेहमी लक्षात ठेवा..मंजिल उन्ही को मिलती है, जो मंजिल के दिवाणे हो … त्यासाठी मात्र हवी प्रचंड इच्छाशक्ती व मेहनत करण्याची तयारी..कार्यक्रम अध्यक्ष स्थानी लेखक मधुकर गिरी हे होते *कार्यक्रम चे सूत्रसंचालन जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांनी केलें. भाग्यवान विजेते पुस्तकं रूपात डॉक्टर प्रशांत आमरे यांना दिले. आभार कवियत्री सौं सुनंदा पाटील यांनी केलें . यशस्वी भव: – विशाल पाटील..
