
दिंडोरी येथील प्रिय मित्र आणि आपल्या आदिवासी भागातील अनुभवांना शब्दबद्ध करणाऱ्या ‘ उंबरगुज’ या आगळ्यावेगळ्या ललित लेख संग्रहाचे लेखक अनंत चौधरी सर म्हणजे एक प्रेमळ व्यक्तिमत्त्व. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कार्यरत असलेले चौधरी साहेब म्हणजे रसिकवाचक. स्वतः पुस्तकं विकत घेऊन वाचण्याची आणि माझ्यासारख्या अनेकांची पुस्तकं विकत घेत रसिकांना भेट देण्याची त्यांची सवय ही खूपच कौतुकास्पद, अभिमानास्पद आणि अनुकरणीय आहे… त्यांनी त्यांचे बंधू आणि आदिवासी भागात कार्यरत असलेले शिक्षक संदीपभाऊ चौधरी व उत्तमराव झिरवाळ यांना दीपावलीनिमित्त माझे ‘सूत्रसंचालनासाठी’ हे पुस्तक भेट दिले. सन २०१६ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या आजपर्यंत तीन आवृत्ती प्रकाशित झाल्यात. या तिन्हीही आवृत्त्यांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे मी भरून पावलो आहे.* *हे निर्मळ प्रेम… हा जिव्हाळा… ही आपुलकी हेच चौधरी साहेबांचे बलस्थान आहे. यामुळेच ते माझे खऱ्या अर्थाने समृद्ध मित्र आहेत… सर आपणास कृतज्ञतेचा नमस्कार!*
