
सिन्नर (प्रतिनिधी)महान सम्राट बळीराजा बलिप्रतिपदा दिनानिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांचा वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी बळीराजा यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले*याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्त्व होऊन गेलल्या भारतीय बहुजनसमाजाचा एक असा महान सम्राट प्रशासक न्याय समांतावादी व्यवस्थेचा अधिपती होते कृषी क्षेत्र अतिशय प्रगत राज्य होते त्याकाळी त्यांनी पाणी अडवण्याचे ज्ञान होते ज्याचा वापर धान्य पिकवण्यासाठी ते करायचे म्हणजेच आज धरणे, बांधरे जलसिंचनासाठी ज्ञान त्यांना त्यावेळी होते बळीराजाच राज्य हे नऊ खंड ९भागमध्ये विभागलेले होते

त्यासाठी एक अधिकारी नियुक्त असायचा महात्मा फुले बळीच्या राज्याचा म्हणजेच आपल्या देशाचा उल्लेख “बळीस्थान” असा करतात. खंडोबा, म्हसोबा, जोतिबा, काळभैरव, मल्हारी मार्तंड, इत्यादि बळीराजाच्या राज्याचे सरदार होते, ज्यांना आपण आपले कुलदैवत मानतो. बळीराजाचा इतिहास व्यापक होता ,त्याकाळी राज्यातील सर्व प्रजा सुखी होती म्हणून आजहि आपल्या आयाबाया नव-याल यांचा दिवशी ओवाळतात आणि इडा पीडा टळू दै बळी च राज्य येऊ दे असे म्हणत बळीराजाच राज्य परत.मागतात असे म्हणाले*यावेळी अभिवादन करण्यासाठी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे, मा.नगरसेवक रूपेशभाऊ मुठे प्रभाकर गाडेकर,योगेश सोनवणे, संजय शिंदे लक्ष्मण शिंदे, दिलीप कुलथे, संदिप मुठे किरण मुठे रोहित मुठे शाम डांगे आदी.उपस्थित होते*
