
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०६६ वा दिवस
खरे म्हणजे या धर्माने आपल्याला शिकविले आहे की, प्रत्येक जीव हा तुझ्या ठायी असलेल्या आत्म्याचेच दुसरे रूप आहे. तुमच्याच त्या प्रतिकृती आहेत. परंतु या सांगाव्याचे आचरण आपल्या हातून घडले नाही. कारण सहभावाचा, ह्रदयातील ओलाव्याचा अभाव ! दरिद्री, दुःखी, पतित यांच्याशी जिव्हाळ्याने कसे वागावे हे तुम्हाला शिकविण्यासाठी परमेश्वराने भगवान बुद्धांचा अवतार घेतला. पण तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल तर ना !
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ३० अश्विन (इषमास) शके १९४७
★ कार्तिक शुक्ल /शुध्द १
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. २२ ऑक्टोबर २०२५
★ बलिप्रतिपदा, दीपावली ‘पाडवा’
★ अभ्यंगस्नान, गोवर्धन पूजन, अन्नकूट
★ विक्रम सवंत २०८१
★ महावीर निर्वाण महावीर जैन संवत २५५२
★ हेमंतऋतू प्रारंभ
★ १९०० क्रांतीकारक अशफाकउल्ला खान यांचा जन्मदिन
★ १९३३ थोर देशभक्त, राजकीय नेते, हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले अध्यक्ष, सरदार पटेल यांचे थोरले बंधू बॅ. विठ्ठलभाई पटेल यांचा स्मृतिदिन.
★ १९६३ भाक्रा नांगल धरण पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण
★ १९७८ साहित्यिक, प्रसिध्द वक्ते नारायण सिताराम तथा ना. सी. फडकेंचा स्मृतिदिन.
२००८ भारताने आपल्या पहिल्या मानवविरहित चांद्रयानाचे (चांद्रयान-१) प्रक्षेपण केले.
★ दिवाळीचा सण आला, सर्वानाच पाहिजे केला. परि पाहावा कोण राहिला भुकेला घरी त्यास आमंत्रित करावे गोडधोड भोजन द्यावे, परस्परांनी मिळून चालवावे वैभव सर्वांचे – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
