
नाशिक. (प्रतिनिधी ) नाशिक विभागीय शिक्षणउपसंचालक कार्यालयात गेल्या तीन महिन्यापासून कामे प्रलंबित आहेत. काही ना काही कारण सांगून शिक्षण उपसंचालक संजय सिंग राठोड ऑफिसमध्ये हजर राहत नाहीत.. साधे साधे नियमित काम सुद्धा शिक्षकांच्या झालेले नाहीत. .यामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड रोष निर्माण झाला असून त्या विरोधात शिक्षक संघटनांच्या वतीने अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला.. याचा जाब विचारण्यात आला.नगरपालिका व महानगरपालिका मधील कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होत नसून ऑगस्ट महिन्यापासून नियमित वेतन प्रलंबित आहेत 2. दोन वर्षापासून वैद्यकीय बील विलंबित आहेत. 3. अंशदान व निधी 2023 पासून मिळालेला नाही. यासह 4. अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या शालार्थ आयडी व ड्राफ्ट बाबत चार महिन्यापासून काहीही कारवाई झालेली नाही. यासह नियमित काम सुरळीत झाली नाही तर चार नोव्हेंबर 2025 ला शिक्षण उपसंचालक कार्यालयाला ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिला. यावेळी उपस्थित असलेले सहाय्यक उपसंचालक श्रीधर देवरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवाजीराव राजीवडे ,विनोद चव्हाण, विकास तरटे, दत्तात्रय डेंगळे, सुनील जाधव, राम धोंगडे, कलीम अन्सारी, प्रतापसिंग गिरासे ,योगेश्वर मोजाड , यांच्यासह नगरपालिका व महानगरपालिकेतील अनेक शिक्षक उपस्थित होते.
