
मालेगांव प्रतिनिधी, नाशिक , मालेगांव येथील सुप्रसिद्ध राष्ट्रीय कवी लेखक व समीक्षक संजय मुकुंदराव निकम यांच्या एक ज्वलंत परिवर्तनाचा इतिहास – ठिणगी या कादंबरीचे प्रकाशन,९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या पानिपतकार लेखक विश्वास पाटील यांच्या हस्ते भुजबळ नॉलेज सिटी कॉलेज, नाशिक,येथे करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास साहित्य क्षेत्रातील मान्यवर कवी आणि लेखक स्वानंद बेदरकर,माणिक गोडसे,संजय चंदात्रे,आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष शेफाली भुजबळ यांनी प्रमूख पाहुण्यांचा परिचय करून दिला.सागर जाधव यांनी उपस्थित नागरिकांचे आणि रसिक श्रोते यांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. रविवार दि १९/१०/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.
