
.ओझर: दि.२० वार्ताहर येथील ‘मविप्र’ समाज संस्थेच्या बोरस्ते विद्यालयात आद्य संस्थापक कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्याध्यापक सोपान वाटपाडे, लिपिक नाठे, गणेश मोरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन होऊन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षिका मंगल सावंत मेघा शेजवळ संगीता शेटे शितल आहेर लता आहेर योगेश डंबाळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे म्हणाले की, ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या उक्तीप्रमाणे कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांनी समाजातील गोरगरीब दीन दुबळ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी नाशिक जिल्ह्यात मविप्र संस्थेच्या अनेक शाळा सुरू करून ज्ञानगंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे मोठे कार्य कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांनी केल्याचे भाषणात सांगितले. फलक रेखाटन कला शिक्षिका मोनाली निकम यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले.
