
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०६४ वा दिवस
अनुमानातील सदोषतेविषयी पुढील गोष्ट लक्षात ठेवावयास हवी. अनुभवाचे साधन, अनुभवाची पद्धती आणि त्या अनुभवाची पुनरावृत्ती ही सारी विशुद्ध असली तरच प्रत्यक्ष अनुभव हा प्रमाण मानता येतो. इंद्रियातील विकृतीमुळे किंवा भावविवशतेमुळे निरीक्षणात दोष उत्पन्न होतात. म्हणूनच प्रत्यक्ष अनुभव हा अनुमानाचाच एक प्रकार होय. म्हणून सगळे मानवी ज्ञान हे अनिश्चित असते आणि ते चुकीचेही असू शकते. खरा साक्षी कुणाला म्हणावयाचे? तो सांगत असलेली गोष्ट ही त्याच्या प्रत्यक्ष अनुभवास आलेली असली तरच त्याला खरा साक्षी म्हणावयाचे. ह्या न्यायाने वेद सत्य आहेत, कारण सुयोग्य वा अधिकारी व्यक्तींचा पुरावा त्यात समाविष्ट आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २८ अश्विन (इषमास) शके १९४७
★ अश्विन कृष्ण/वद्य १४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. २० ऑक्टोबर २०२५
★ सोमवती अमावस्या दुपारी ३-४४ नंतर
★ नरक चतुर्दशी
★ अभ्यंगस्नान, यमतर्पण
★ १९१६ लोकशाहीर मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ यांचा जन्मदिन
★ १९६९ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची अकोला येथे स्थापना
★ १९७४ प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा मास्टर कृष्णराव यांचा स्मृतिदिन.
★ १९९५ समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार मधू लिमये यांचा स्मृतिदिन.
★ १९९६ युद्धशास्त्राचे अभ्यासक, पत्रकार दि. वि. तथा बंडोपंत गोखले यांचा स्मृतीदिन
★ जागतिक सांख्यिकी दिन.
★ दिपावलीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा…
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
