
*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०६३ वा दिवस* अज्ञानाच्या काळ्याकुट्ट मेघांनी आपला समस्त देश झाकाळून गेला आहे हे बघून तुमचे हृदय पिळवटून निघते काय? या गोष्टी तुम्हाला अगदी बेचैन करून सोडतात काय? या गोष्टींमुळे तुमची झोप उडून गेली आहे काय? काय ह्या भावना तुमच्या नसानसांतून सळसळत आहेत? तुमच्या अगदी रक्तात भिनल्या आहेत? तुमच्या हृदयस्पंदनांशी एकरूप झाल्या आहेत? त्यांनी तुम्हाला अगदी वेडे करून सोडले आहे? विनाशाच्या या दुःखाने तुम्हाला पूर्णपणे ग्रासून टाकले आहे? आणि ही स्थिती दूर करण्यासाठी तुम्ही आपल्या नावलौकिकावर, आपल्या पत्नीवर, पुत्रांवर, आपल्या धनदौलतीवर, एवढेच नव्हे तर आपल्या शरीरावर देखील पाणी सोडले आहे? हे सारे तुम्ही केले आहे? देशभक्त होण्याची अगदी हीच पहिली पायरी आहे. *स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर २७ अश्विन (इषमास) शके १९४७*
★ अश्विन कृष्ण/वद्य १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. १९ ऑक्टोबर २०२५
★ १९२० समाजसुधारक, रॅमन मॅगसेस पुरस्कार विजेते आध्यात्मिक गुरू, प्रवचनकार, स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पद्मविभूषण पांडूरंग शास्त्री आठवले यांचा जन्मदिन – “मनुष्य गौरव दिन”
★ १९५४ मराठीत ललित लेखन करणार्या अभिनेत्री प्रिया विजय तेंडुलकर यांचा जन्मदिन.
