
नांदगाव ( प्रतिनिधी ) नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,नाशिक संचालित व्ही.जे.हायस्कूल येथे पर्यावरण पूरक आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.विद्यार्थ्याच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा शालेय अभ्यासा व्येतिरिक्त विद्यार्थांना नवीन गोष्टी शिकण्याचा आनंद मिळावा व विद्यार्थाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळा विविध उपक्रम राबवीत असते.या दिवाळी निमित्त चित्रकला विषया अंतर्गत आकाशकंदील तयार करणे दोन दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीचा स्वनिर्मितीचा आनंद या कार्यशाळेतून विद्यार्थांनी घेतला .घरातील टाकाऊ कागदी पुठ्ठाचा वापर करून टिकाऊ असे आकर्षण आकाशकंदील विद्यार्थांनी तयार केले

.कलाशिक्षक विजय चव्हाण यांनी विद्यार्थांना पर्यावरण पूरक आकाशकंदील तयार करण्याची संकल्पना विद्यार्थांकडून साकार करून घेतली त्यांनी या दोन दिवसात घरातील टाकाऊ कागदी पुठ्ठा व विविध पेपरचा उपयोग करून त्या पेपरची कटिंग,पेपरवर डिझाईन काढून चिटकविणे , स्प्रे च्या सहाय्याने रंगकाम करणे असे बारीकसारीक गोष्टींचे मार्गदर्शन करून आकाशकंदील तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले .यात विद्यार्थांनी या दोन दिवसाच्या कार्यशाळेत टप्प्या टप्प्या सर्व कलाकुसर आत्मसात करून सुंदर असे आकाशकंदील तयार केले.विद्यार्थांनी तयार केलेले आकाशकंदील स्वता विद्यार्थी आप-आपल्या घरी लावणार आहेत. कार्यशाळेसाठी नियोजन संदर्भात मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ठाकरे शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे ,उपमुख्याध्यापक जोगेशवर नांदूरकर ,गुलाब पाटील,प्रवीण अहिरे,मंगेश सरोदे,विलास काकळीज याचे मार्गदर्शन लाभले.
